"एकला चालो रे..."

"म.टा. ला वाचलंस का?’मिथक’वाले तेंडुलकर नाट्य महोत्सव साजरा करणार आहेत..जायचं का?"
"अरे वा..तुझे आवडते लेखक ना ते??नाही गं..मला यायला जमणार नाही...एकदोन कामं उरकायची आहेत.."
"म्हणजे झालं...यावेळीही एक चांगला कार्यक्रम मी मिस करणार.."
मला ना हे कुणी सोबत असण्याची इतकी सवय होऊन गेलीये की कुठे एकटं जायला नको वाटतं..
जन्माला आले ती एकटी..तेही नाईलाज होता म्हणून कदाचित..
त्यानंतर मला प्रत्येक वेळी सोबत मिळाली..ती आजतागायत..
मित्र-मैत्रिणी भरपूर..त्यामुळे कुठे एकटं जायचा सवाल नाही...
पण ग्रॅज्युएशन नंतर सगळे भसाभसा सर्व दिशांना पांगले..आणि मला कंपनी मिळायची मारामार झाली...
म्हणजे जायचं असतं खूप ठिकाणी पण सोबत नसल्यामुळे राहून गेलं असं माझ्याबाबतीत बहुतेक वेळा झालं..
कालांतराने मी एकटी जायला शिकले..त्यातून नव्या ओळखी झाल्या..
मग अगदी देवाने पाठवल्यासारखा ’प्रिय’ भेटला...आणि दैवयोगाने त्याचे आणि माझे बहुतेक सगळे 'interests' सारखे..
त्यामुळे मी कुठे जायचा घाट घालायचा आनि ’प्रिय’ने ’हो’ म्हणायचं...असं अंगवळणी पडलं होतं..
पण..मला एक्झॅक्ट ठाऊक नाही कधी..पण तो माझ्याबरोबर यायला ’नाही’ म्हणाला..
तेव्हा ’असेल काहीतरी काम..नंतर कधीतरी जाऊ..’म्हणत मीही एकटं जायचं टाळलं होतं...
पण आज लागोपाठ दुसरयांदा???
माझ्या फ़ोनवरच्या प्रदीर्घ शांततेचा ’जाता येणार नाही म्हणून फ़ुगून बसली आहे’ असा सोयिस्कर (आणि अत्यंत अचूक) असा अर्थ लावून ’प्रिय’ मला समजावणीच्या सुरात म्हणाला..
"मी ’नाही’ म्हणणार आणि तू नाही जाणार..असं किती वेळा करणार तू??असे प्रोग्राम्स वारंवार होत नाहीत..आणि दुसरयाची सोबत वगैरे ज्या गोष्टी आपल्या कह्यापलीकडच्या आहेत त्यावर अवलंबून का रहा??एकटं जाऊन तर बघ...मजा येईल तुला.."
खरंच...असे कार्यक्रम वारंवार होत नसतात...आणि मला मनापासून या कार्यक्रमाला जायचेच होते..
आणि म्हणूनच ’प्रिय’चा सल्ला शिरसावंद्य मानून मी एकटी तेंडुलकर नाट्य महोत्सवासाठी यशवंत नाट्य मंदिरात दाखल झाले..
११चे नाटक आणि १०.३० वाजले तरी नाट्य मंदिरात शुकशुकाट होता..
भरमसाठ दाढी वाढलेला कुर्ताधारी बुवा, ज्या ’नियतीच्या बैलाला..’ नाटकाला मी आले होते त्या नाटकाचे pre-reading करणारी एक मध्यमवयीन बाई आणि मी, अशी आम्ही इन मीन तीन माणसे होतो..
त्या बाईच्या हातातले ’नियतीच्या बैलाला..’बघून तर मला जाम कॉम्प्लेक्सच यायला लागला..
माझ्या बॅगेत याक्षणाला एरीक सीगलचे ’लव्ह स्टोरी’ होते..
मला अचानक खूप थिल्लर वगैरे वाटायला लागलं..
एकतर माझ्याबरोबर बोलायला कोणी नाही आणि आहेत ती दोघं Good As Nothing...
ही दोन भुतं तर मी एक हडळ..असा मनातल्या मनात जोक पण करून बघितला..पण मलाही हसू आले नाही तेव्हा Self-Amusement चा नाद सोडला..
मी गप्पा उकरूनही काढल्या असत्या पण प्रतिसाद शून्य असेल तर काय घ्या??म्हणून मी थोडा वेळ बाहेर भटकायला गेले...
माझं रुपारेल कॉलेज एकदा डोळाभर पाहून घेतलं..लेमोनेडची तहान भागवून एकदाची पुन्हा त्या भुताटकीत आले..
बट इट वॉज नो मोर भुताटकी..
चांगली सत्तर एक माणसे जमली होती प्रयोगाला..
हिरवळ...हिरवळ...
शिट! इकडेही आमचे नशीब फ़ुटके..
त्या सर्व गर्दीत एक पाच फ़ूट आठ इंच मरून शर्ट, एक हळदी कलर कुर्ता आणि एक स्पायकर पँट एवढीच ’हिरवळ’ होती..
इनॉर्बिटला जायच्या त्या वाट चुकून यशवंत आल्यासारख्या वाटणारया तीन नवतरूणी माझ्या शबनम बॅगेकडे, माझ्या डिझायनर सॅंडल्सकडे बघून कुचूकुचू बोलत होत्या..
मी त्या गर्दीत घुसले..
नाट्यगृहाच्या परिसरात ’नाटक’ सोडून इतर विषयावर बोलायला बंदी असल्यासारखा त्यातला प्रत्येक माणूस चेहरा लांब करून गप्पा मारत होता..
मी अर्धी नाटकं ’प्रिय’बरोबर बघितली..पण नाटक सुरु होण्याच्या आधी नाट्यविषयक चर्चा. प्रायोगिक रंगभूमी असल्या गप्पा मारण्याचे धाडस नाही केले कधी..
आमच्या गप्पा म्हणजे..राज ठाकरेने भाषणात कुठल्या शिव्या वापरल्या??? किंवा तहसीलदार कचेरीतली अफ़रातफ़र किंवा तू माझ्याहून मूर्ख कसा??? अशा टाईपच्या...थोडक्यात ’नाटक’ सोडून काहीही..
एका ग्रुपजवळ थांबून मी ती लोक कशावर चर्चा करतायेत हे ऐकायचा प्रयत्न केला..
हरे राम..
कोण कशावर बोलतोय?? आपण बोलतोय त्याचा समोरच्याला संदर्भ लागतोय लागतोय का??याचा अजिबात मुलाहिजा राखायचा नाही असा निश्चय करून आल्यासारखी माणसं वाचाळत होती..
अर्थात याने समोरच्याला काही फ़रक पडत नव्हता कारण तो पण तशाच निश्चयाने बोलत होता...
एकच वाक्य ती मंडळी वेगवेगळ्या भाषेत रेकॉर्ड अडकल्यासारखी पुन्हा पुन्हा बोलत होती तरी बोंबलायला कोणाला पत्ताच नव्हता..
मध्येच मला एका बायकांच्या ग्रुपला ’तेंडुलकरांच्या नाटकांमधले वेश्यांचे स्थान काय हो??" असं विचारून फ़ेफ़रं आणण्याची जबरदस्त उबळ आली..पण मी ह्र्दयावर दगड ठेऊन ती आवरली..
साकल्याने, इत्यंभूत, मेन-स्ट्रीम...शब्द तर परिसरात तण माजावे तसे माजले होते...
ते तण बाजूला करत मी दरवाजापाशी आले आणि आम्हाला आत सोडण्यात आले..
आतला एसीचा सुखद गारवा अंगावर घेत बसले होते तेवढ्यात माझ्या बाजूच्या सीट वर स्थानापन्न झाला तो पा.फ़ू.आ.इं.म.श..(पाच फ़ूट आठ इंच मरून शर्ट)..
आहाहा!!...नाटकाचा वेळ काही वाईट जाणार नव्हता तर...
मी ताबडतोब ’प्रिय’ला केला की माझ्याबाजूला पा.फ़ू.आ.इं.म.श बसला आहे..
बस आता चरफ़डत..माझ्याबरोबर नाटकाला येत नाही काय??..
’मिथक’वाल्यांचे नमस्कार-चमत्कार झाले...आणि नाटक सुरु झाले..
मी ’नियतीच्या बैलाला..’आधी कधी वाचले नव्हते पण तेंडुलकरांचे नाटक..त्यामुळे ते भारी सिरीयस असेल यात तिळमात्रही संदेह नव्हता...
पण माफ़क विनोद होता...
पहिल्या विनोदाच्या वेळी मी आपलं नेहमीचं सातमजली हो..हो..हो करून हसले..
आणि माझं हसणं विरत असताना मला बाजूने ’खिक’ ऐकू आलं..
मला धक्काच बसला..
ते ’खिक’ ’पा.फ़ू.आ.इं.म.श’चे होते..
प्रत्येक विनोदाला माझे ’हो..हो’ आणि त्याचे ’खिक खिक’..
पहिला धक्का ओसरला आणि मी ते ’खिक’ एंजॉय करायला सुरुवात केली..
त्याच्या अदमासे सहा फ़ुटी देहाला न शोभणारे ते ’खिक’ ऐकत मी प्रत्येक वेळी नव्याने खिदळत होते..
इंटरवलमध्ये त्या नवतरूणी येऊन ’तुम्ही ही बॅग कुठून घेतली हो?’ विचारून गेल्या...एक मावशी येऊन "Beta..Where did you have your hair-cut?" अशी चौकशी करून गेल्या..माझ्या पुढच्या काकांनी "तू सेम माझ्या पुतणीसारखी हसतेस!" म्हणून कॉंप्लीमेंटस (?) दिल्या.....पा.फ़ू.आ.इं.म.श माझ्याच कॉलेजचा एक्स-स्टुडंट निघाला..
मी जेव्हा कोणाच्या सोबतीने कोठे जाते तेव्हा माझ्या बाजूला कोण बसलंय, कोण काय बोलतोय, कोण आपल्याकडे बघून कुजबुजतोय..या गोष्टींकडे माझे लक्षच नसते...किंबहुना त्यांच्याकडे लक्ष देण्याची मला गरज वाटत नाही...
पण आज तरणोपाय नसल्यामुळे या गोष्टी मी बघितल्या..अनुभवल्या..आणि माझ्या लक्षात आलं की ’प्रिय’ मला ’मजा वाटेल तुला’ असं का म्हणाला होता ते...
’प्रिय’ बरोबर असताना किंवा दुसरं कोणीही बरोबर असताना भोवतालच्या जगाशी नातं तोडून घ्यायची एक विचित्र खोड मला लागली होती..
’प्रिय’ आणि मी असा विचित्र कोष मी माझ्याभोवती बनवून घेतला होता..
आणि त्यामुळे भोवतालच्या लोकांना नोटीस करणं, ती लोकं आपल्याला कुतुहलाने बघतायेत, आपल्या ’प्रेझेंटेबल’ अवताराबद्दल काही लोकांच्या नजरेत कौतुक आहे ..हे सारं बघणं...अनोळखी माणसांशी संवाद साधणं...It was long forgotten..!
वेल..’प्रिय’ knew it..त्याला नेहमीच सगळं माहीत असतं...
आणि मी पूर्णतया विसरायच्या आधी माझ्या हे ध्यानात आणून देणं ’प्रिय’ला गरजेचं वाटलं..
आणि म्हणूनच तो मला ’नाही’ बोलला होता...
मी मला झालेला साक्षात्कार ’प्रिय’ला बोलून दाखवला तेव्हा तो नेहमीसारखंच समजूतदार हसला..मिशीतल्या मिशीत!
तो तर नेहमी म्हणतो..थोरामोठयांची वचने नेहमी लक्षात ठेवावीत..
रविंद्रबाबूंनी उचितच म्हटलेय आणि मी करंटी उगीचच त्याच्याकडे काणाडोळा करत होते..
"एकला चालो रे..."

13 comments:

Abhijit Bathe said...

आयला! लकी आहेस!! माझे (एकट्याचे) अनुभव फारसे वेगळे नाहीत, पण हिरवळ माझ्या आजुबाजुला कधीच फिरकली नाही! :))
(अर्थात त्याला मी ही हिरवळीशेजारी जाऊन बसलो नाही - हे ही कारण असेल!)....

एनीवे - ’मोस्ट्ली’ चांगलं लिहितिएस. Keep it up!

Jaswandi said...

sahich!
mi suddha ajunparyant ekatine jayacha TaLat aalye..tujha anubhav vachun mi hi ata kadachit jaun bahin ekda ekaTi :)

Shraddha Bhowad said...

अभिजीत..
चांगला शालजोडीतला दिलायेत बरं का??
’हिरवळीच्या’ बाबतीत तशी मी आतापर्यंत लकी ठरत आलेले आहे..
ग्रहांची स्थिती अनुकूल नसेल तुम्हाला कदाचित..
[:)]

Shraddha Bhowad said...

@वैभव..
धन्यवाद..
असंच कळवत रहा..
@जास्वंदी..
एकटं जाशील तर खूप लोक जमतील अशीच प्लेस निवड पण..
नाहीतर जाम बोअर मारते..

Unknown said...

kadhi kadhi 1 tyane natak, sinema etc.. goshti karyla khup maja yete.. aaj tu ha anubhav ghetlas. tuzya 'PRIY' la khare tar dhnayvad dyala havet tyabbaddal.
ekhade natak suru hotana aani te samplyavar, lokanche nirikshan karyche. itke chhan anubhav yetat ki bassss....! tari tu mumbait aahes mahnun.. punyat aastis tar... balgandharv kiva tilak la lokanche nirikshan karyche.. aamhala khup kahi kalte aani aaamhi khupo hushar, aaasach aavirbhav aaasto eke ekachya cheharyavar.. kahinna kalat aasela hi pan..halli ti 1 fashion aali aahe.. jo karykarm tyavar khumasdar, charcha karychi aaagadi aaatlya aavajat.. te hi dusryakade Tchatene pahat.. jase DECCAN QUEEN aani INDRYANI Exp. lonavlyala ekatr yetat tevha decaan madhle lok aasech indrayni valyankde tuchatene baghat aastat.. ha anubhav mi 2 nhi gadyat basun ghetla aahe.
baki 1 tepanachi majach nirali..
kadhi kadhi ekte aasave manasane.. aarogyala changale aaste. karan koni tari mahnlecgh aahe.. sarkhe mitr mandalinchya aani natevaikanchya gotavlyat raahne.. {is injurance to health}....
aaso, aasech chhan chaan lihit ja.. mahnej amhala aamche kahi anubhavya nimittane share karta yetil......

Abhijit Bathe said...

गैरसमज - हिरवळी शेजारी म्हणजे मला पा.फु. न.इं.म.श. जसा हिरवळी शेजारी जाऊन बसला तसा मी कधी गेलो नाही असं म्हणायचं होतं.

Shraddha Bhowad said...

तरी सुद्धा मी असंच म्हणेन...
पा.फु. न.इं.म.श. माझ्या शेजारी 'at his will' येऊन थोडीच बसला??
त्याला माझ्या शेजारचं तिकीट मिळालं..
दैववशात...
तुम्हाला असं तिकीट कधी मिळालं नसावं असं म्हणायचं होतं मला..

Shraddha Bhowad said...

@मोहित..
पुणेकरांची बातच निराळी..
ती लोकं पाळण्यातच नाटक, संगीत आदी चौसष्ट कलांचं बाळ्कडू पाजल्यासारखं वागतात..
बालगंधर्वचा crowd मी पण बघितलाय आणि मजबूत दात काढलेत एकेवेळी..

Meghana Bhuskute said...

dhamal ahe!

Dheeraj Masodkar said...

simply superb!

Dk said...

hmmm good one! mi hi ascaach ekda hukkie yeun shaastreey sangeetaachyaa karykarmaalaa girgaavaat ektaach gelo hoto an durdaiv evdh chaan ki tisryaa ki chuthyaa raagaanantar maazyaa "shejaarchee hirval chaanch astaanaa" mi chakk zoplo! aani mag kaay shevtee kaarykram samplyaavar sejaaruun uthvnyaat aale ki chal rav utha sampli vel :(

Nil Arte said...

मुलांच्या दृष्टीकोनातून :
पा. फु. न. इं. म. श. ला "हिरवळीची हिरवळ" म्हणावे काय ??

खिक आणि ख्यक !!

Shraddha Bhowad said...

निळ्या,

हा हा हा, ज्योक!
रात्री एक चाळीसला तुला इतकी हुश्शार कमेंट सुचते याबद्दल मला कित्ती कित्ती बाई तुझं कवतुक वाटतंय!

:P

 
Designed by Lena