नॉस्टॅल्जिया के खातिर!

एका आठवडयापासून संवेद, कोहम, संवादिनी आदी ’दादा’मंडळींनी चालवलेला ’खो-खो’ उपक्रम नेमाने वाचतेय..हे दादा लोक जाम पार्टी-पार्टी करतात राव!
’खो-खो’मध्ये ’खो’ मिळायचे सोडाच पण आपण साधे लिंबू-टिंबू पण नाही आहोत हे पाहून मला जाम फ़णकारा आला बुवा!
असू देत...बडे लोग...बडे लोग!!!
अर्थात कशाचा कशाला काही संबंध नाही...माझं आपलं उगाचच...पण हा ’खो-खो’ माझ्या या पोस्टला कारणीभूत आहे हे नक्की!
जुन्या आठवणी...दुसरं काय असणार???
झप्पकन मागे जायला झालं...Cut to मला कविता करण्याचा आणि वाचण्याचा चस्का लागला होता त्या काळात...
प्रत्येक पानाला चमकदार पानाफ़ुलांची वेलबुट्टी..फ़ाऊंटन-पेनने सुबक अक्षरात लिहीलेल्या कविता...पन्नास एक कविता झाल्या की रेशमाच्या धाग्याने गाठीचे टाके घालून तो सेट पेटीत ठेवून द्यायचा..असे एकूण तीन सेट्स...दीडशे कविता..
आल्यागेल्यासमोर आईने अभिमानाने मिरवावं असं अत्यंत देखणं काम..
अज्ञातवासात दोन वर्षे काढल्यावर एका आठवडयापूर्वी ’खो-खो’चे निमित्त झाले आणि वहीला बघण्याचा योग आला...
ज्या कविता माझ्याकडे नाहीत त्या लिहून काढाव्यात हा उद्देश..
भरून आलं च्यायला नकळत..फ़ुलपाखरी दिवस..अल्लड वय..काही हळवं वाचलं की टचकन भरणारे डोळे...अनंत सामंतांच्या ’मितवा’च्या प्रेमात पडायचं वय!
मी लिहीलेल्या कविता प्रकाशित पण करणार होते मी...पण नंतर राहूनच गेलं...
’खो-खो’ मध्ये आतापर्यंत लिहिलेल्या बहुतेक सगळ्या कविता माझ्या या वहीत आहेत..
पण..
दोन कविता माझ्या अत्यंत आवडत्या आहेत पण त्या आतापर्यंत मला कुठेही दिसल्या नाहीत किंवा मी मिस केल्या असतील..मला इव्हन आंतरजालावर पण कुठेही संदर्भ मिळाला नाही..
इतक्या सुंदर कविता अपरिचित राहाव्यात..मला नाही पटले..
म्हणून चोंबडेगिरीच म्हणा हवं तर...करून त्या कविता इथे देण्याचा मोह नाही आवरला...

समोर कॅन्व्हास कोरा, पुढ्यात रंग....
मी उत्सुक तिच्याकडे पाहत...
तिला मी तिचे मन रंगवायला सांगितले आहे...

वाटते... आता ब्रश उचलण्याइतकाही
धीर असणार नाही तिला
ती माखत राहील रंगच रंग
विस्तारत नेईल तो रिकामा चौकोन सगळा...

रंगावर रंग... तुडुंब
जुन्या भेटीचे ते सगळे कोवळे
थरावर थर थरथरणारे...ते कोवळे...ते सोनेरी पिवळे
झिम्म काजळधारेतून लुकलुकणारे ते उजाळे....
रक्तातून धावणारे ते लाल निळे...

तिने उचलला एक हिरवा तो समुद्रतळाचा केला
आणि फ़क्त एक लहानसा ठिपका दिला
ठिपका वेडावाकडा पण जिवंत कमालीचा..
वाटले हा एकच एक आता पसरेल सर्वभर
मी एकाग्र पाहत राहिलो अवकाश त्याचा...

नंतर मात्र काहीच काढले नाही तिने...
नुसतीच हासली ...म्हणाली....
" हा तू ! बाकी सारे कधीच मिटले...
एवढेच होते मनभर झालेले...!"

-अरूणा ढेरे

निर्मितीचं एक नातं जमिनीशी आहे,
कारण
तीच आहे जन्मदात्री, सारया भविष्याची
मातीशी ईमान सांगणारे युवकांचे तांडे
प्रेरणांच्या तरफ़ांवर उद्याची क्षितीज उजळवीत
अन ओसपणाचे कोसच्या कोस तुडवीत
जेव्हा निघतील दाही दिशांनी
दरयाखोरयांमध्ये आपले नि:श्वास उतरवीत
तेव्हा ही धरित्री होईल
सुजलाम सुफ़लाम मंगलदायिनी

-बाबा आमटे

आता वही पेटीत परत जाणार नाही हे नक्की!
’खो-खो’ तर नाही..लंगडी घालून घेतली झालं..
सगळ्यांना ’आवट’ केले नाही मी???

13 comments:

Dhananjay said...

hi,
pahili kavita avadali. adhi vachleli navati. Babanchya kavitebaddal bolaylach nako. Thanks

Sumedha said...

वा! खूप छान कविता वाचायला मिळाल्या. कुणी खो द्यायची वाट कशाला बघायची? खो तर एक मिनित्त, इथे कोणी दिग्गज नाही, ना कोणी लिंबूटिंबू! आपल्याला आवडेल ते इतरांपर्यंत पोचवत राहा, त्याचाच तर आनंद!

आश्लेषा said...

पहिली कविता फार आवडली.धन्यवाद.

a Sane man said...

mastach mast...thanks for posting...

Meghana Bhuskute said...

सुमेधाशी सहमत. इथे कुणी दादा नाही नि कुणी लिंबू-टिंबूपण. या निमित्तानं तुमचा ब्लॉग वाचला. मजा आली. तुम्हीच करा की सुरू एखादा नवा खोखो. कुणी खो द्यावा म्हणून वाट कशाला बघत बसायची?

Jaswandi said...

mastach!! :)

Samved said...

आई गं...माझी लहान बहीण पण मला दादा नाही म्हणत अगं....तर मुद्दा असा की वाटलं की लिवून टाकायचं गुमान, अवताणाची वाट पाहात दगड होण्यात काय पॉईन्ट?
ब्येष्ट आय्ड्या, तू नवा खो सुरु कर, स्वःतच्या कविता! मग बघ कशी मजा येईल ते...

Anand Sarolkar said...

Kavita mast ahet :) samved shi sahmat!

Meghana Bhuskute said...

तुमच्याशी संपर्क साधायचा आहे, तुमचा इ-पत्ता मिळेल काय?
माझ्या जीमेलच्या पत्त्यावर कळवलेत, तर फार बरे होईल.

यशोधरा said...

एकदमच आवट!! सुरेख कविता..

Meghana Bhuskute said...

तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही दिलेल्या इपत्त्यावरून काहीच उत्तर आले नाही. पत्र मिळाले आहे ना, हे विचारण्यासाठी हा खटाटोप. तांत्रिक कारणांमुळे संपर्क अडू नये म्हणून. माझ्या जीमेलच्या पत्त्यावरून तुम्हांला पत्र पुन्हा पाठवते आहे.

Tulip said...

श्रद्धा खूप उशिरा वाचला तुझा ब्लॉग. कसली जबरी लिहिली आहेस सगळी पोस्ट्स. सही स्टाईल आहे तुझी. तिरक्या, बंबी, एकला चालो, प्रिय तर क्लास.
लिहित जा लवकर लवकर.

Dk said...

hmmm donhii kavitaa aavdly! pahilee visheesh karun!

 
Designed by Lena