’पुरुष’मय स्वप्न!

फ़ार फ़ार वर्षांपूर्वी माझं आणि विनीचं एक स्वप्न होतं.
एक महाल ओनरशिप मध्ये घ्यायचा.
एकदम घियासुद्दीन बाल्बनच्या काळात आल्यासारखं वाटेल असा तो सजवायचा.
आणि सर्वात रम्य कल्पना...सगळे सेवक पुरुष ठेवायचे च्यामायला!
'पुरुष होऊ घातलेले मुलगे' नाहीत, 'मुलगे-पुरुष' नाहीत की पूर्ण मुलगे नहीत तर..पूर्ण पुरुष!
पूर्ण पुरुषांमध्ये ’वरण-भात’ कॅटॅगिरी ला अपात्र ठरवायचं.
रिक्रूट्मेंट ड्राईव्ह ठेवायची.
मऊसूत, कंपासने आखून घ्यावं इतक्या गोल पोळ्या करणारा, कपडे धुणारा, एकही सुरकुती न ठेवता कपडे झटकून वाळत घालणारा, गाद्या घालणारा, चिकन-मॅगी करून हाताशी आणुन देणारा, आम्ही दत्तक घेतलेली मुलं सांभाळणारा.
लोणचं-मुरांबे भरून ठेवणारा, पापड-सांडगे घालणारा ऍड-हॉक बेसिस वर!
डयुटी अवर्स फ़िक्स नाहीत पण फ़ायनान्शियल आणि जॉब सिक्युरिटी ची हमी द्यायची.
मी मदिरापान करून टुन्न झाले आणि मला कोणाशी दोन हात करावेसे वाटले तर त्यासाठी हाय पॅकेजची एक क्रिटीकल पोस्ट ठेवायची.
सगळ्यांना महालात चालवायला बुलेट्स द्यायच्या.
म्हणजे ’कोण आहे रे तिथे?’ असं म्हणून टाळी वाजवली की बुलेटचं ते सेक्साट फ़ायरींग घुमवत एक सेवक बुलेट दामटवत येणार, एकदम स्टड सारखा बुलेट मेनस्टॅंड ला लावणार आणि माझी फ़र्माईश पुरी करणार.
सर्व सेवकांमध्ये ’बुलेट ३५०’ असलेला, ५-९ वगैरे उंची व तेव्हढाच रूंद असलेला, मिडनाईट ब्लू चेक्सचं शर्ट घालून शर्टाचे हात दुमडलेला, फ़िकट निळी डेनिम आणि हातात टॅग ह्युअरचं चामडयाचा पटटा असलेलं घडयाळ घातलेला, दणदणीत मिशी असलेला, भारी ब्लॉग वगैरे लिहीत असलेला सेवक म्हणजे माझ्या मर्जीतला..पटट-दास!
विनीचं थोडयाफ़ार फ़रकाने असंच. पण तिला ती गिळगिळीत ’थंडरबर्ड’ आवडायची.

------------------------


परवा विनीचं लग्न झालं.
तिच्या नवरयाला मिशी नव्हती का त्याच्याकडे ’थंडरबर्ड’ पण नव्ह्ती. बुलेट हातात जरी घेतली तरी कोलमडुन पडेल असं प्रकरण होतं ते. थोडक्यात तो ’पुरुष होऊ घातलेला मुलगा’ होता.
स्कूटरवर बसून जाम अवघडायला होतं म्हणाली.
मी तिला माझा जीव की प्राण असलेलं, एके काळच्या बॉयफ़्रेंडने कुठेकुठे लटपटी करून लाडाने आणून दिलेलं (ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो!) बुलेट ३५० चं अशक्य सीडक्टीव पोस्टर दिलं आहेरात. घळाघळा रडली बिचारी!
आई गं..
अब मेरा क्या होगा कालिया?

21 comments:

Raj said...

चांगले स्वप्न आहे. :D
तरीही कही स्वप्ने प्रत्यक्षात येत नाहीत याबद्दल (एक पुरूष म्हणून) त्या दयाघन प्रभूचे आभार मानतो.
तसेही आमचे सिलेक्षण झाले नसते म्हणा.. :p

Himali said...

LOL :)
i loved your dream...rather i would call it fantasy.. :)
but to tell you frankly, cant imagine that men such like these exist even in dreams!! ;)
ani tu tunn zalyavar tuzya shi fight karnya peksha...why not have a fleet of men who can fight each other off as per your wish...
mhanje te kombadya zunzavataat na tasa...kay dhammal!!!!
i am getting violent these day am i not ;)

हेरंब said...

बाप रे.. ऑफिस च्या एसी मध्ये पण घाम फुटला दरदरून तुमचं हे स्वप्न ऐकून. राजला अनुमोदन.. God is Great !! ;-)

Shraddha Bhowad said...

@ हिमाली,
कल्पना भारी आहे. मी कल्पना करून एकटीच हसत बसले होते. मिशीवाले दणदणीत पुरुष झुंजतायेत. नको गं पण! छान असतात. त्यांना पापड-सांडगे वाळत घालायला लावलेत इथपर्यंतच ठिक आहे.
@ हेरंब
’फ़क्त’ स्वप्न आहे हे :)
काळजी करू नका.
@ राज
तसेही आमचे सिलेक्षन झाले नसते म्हणा?
होपफ़ुल होतास की काय? :)

Shirish Jambhorkar said...

चामडयाचा पटटा असलेलं घडयाळ घातलेला, दणदणीत मिशी असलेला, भारी ब्लॉग वगैरे लिहीत असलेला सेवक
.. विरोधाभास

1 .पण तिला ती गिळगिळीत ’थंडरबर्ड’ आवडायची.

2. तिच्या नवरयाला मिशी नव्हती का त्याच्याकडे ’थंडरबर्ड’ पण नव्ह्ती. बुलेट हातात जरी घेतली तरी कोलमडुन पडेल असं प्रकरण होतं ते.
.... परत विरोधाभास

Samved said...

adbhut!

अनिकेत वैद्य said...

लै भारी. :)
एक पुणेरी शंका.
सेवकांना चालवायला बुलेट तुम्ही देणार का? का ती सेवकांनी आणायची?

Shraddha Bhowad said...

@ संवेद,
:)
@ अनिकेत,
नाही नाही, असं कसं?
सेवकांना चालवायला बुलेट आम्हीच देणार, अर्थात!
फ़क्त एव्हढंच, की पर्सनल मर्जीतल्या सेवकांना ’बुलेट ३५०’चं फ़र्स्ट हॅंड मॉडेल लागू होणार. बाकीच्यांना सेकंड, थर्ड हॅंड गाडय़ा मिळू शकतात. आमचं बजेट तेव्हढं असलं पाहिजे यू सी.
:)
पण सगळ्या रॉयल एन्फ़ील्ड असतील एव्हढं मात्र
खरं

BinaryBandya™ said...

आयला!!!!!!!!!11
ही पोरगी काय लिहील ह्याचा नेम नाही..
जबरा लिहिलंय ...

देवा, हिचे स्वप्न खरे होऊ देऊ नको...

Shraddha Bhowad said...

@ ’बायनरी’(:)) बंड्या,
काय राव,
मी फ़ुकटात बुलेट्स वाटतेय आणि तुम्हाला नको होतेय.
:)

Gouri said...

बलबनच्या महालात बुलेट... भारीच आहे स्वप्न!

Harshada Vinaya said...

loved it :)

Unknown said...

खणखणीत आहे स्वप्न !
फुल ढ्याण्टड्यॅ !!!

Shraddha Bhowad said...

@ Gouri, Harshada Vinaya,

What can I say? Wishful Thinking, ain't it?
;)

@JaguarNac,

आभारी आहे राव!

कोहम said...

Sundar,

Matter chaanacha ahe, pan gist suddha chaan ahe. pratyek jan ek viny astoch. tyamule vinicha scootervar na basata yena ani ticha ghala ghala radana jasta bhavala, aadhichya vinodi dhatanikade janarya likhanapeksha.

great!

BsHrI said...
This comment has been removed by the author.
BsHrI said...

bhari...........jhakaas lihalay ekdam

Ketaki Abhyankar said...

अशक्य लिहिलयस. म्हणजे हे अशक्य आहे असे नाही म्हणायचय मला. हा मी नवीनच शिकलेला एक पुणेरी शब्द आहे. अर्थ-बेफाट, भन्नाट . हे असे काही खरच घडल ना तर कसल भारी होईल यार
तुझ्या "शोध" या पोस्ट सारखाच मला एक प्रश्न पडलाय, की तुला इतक छान कस काय लिहायला सुचत?

Shraddha Bhowad said...

@ मुक्तछंद
बेशक. पुणेरी भाषेतच सांगायचे झाले तर ’कल्ला करू’ आपण पोरी पोरी मिळून.

Shraddha Bhowad said...

@कोहम
विनी जास्त भावली कारण Reality Prevails!दुर्दैवाने! ;)))

@भाग्यश्री
Thanks a tonne!

Yasmine said...

Shraddha, awesome, as usual!

 
Designed by Lena