उपरती.

एरव्ही मी नाकासमोर बघून चालणारी मुलगी!
चालतानाही बाजूने कोणी ओळखीचं जरी गेलं तरी माझ्या लक्षात येणार नाही इतकी मी स्वत:तच गुंग असते.
आज नेहमीच्याच भागात फ़िरताना जरा मान वर करुन पाह्यलं तर तर तलावपाळीवर तीन ताडाची झाडं दिसली. सगळ्या झाडांच्या वर उत्तुंग अशी उभी होती. मला भयानक आश्चर्य वाटलं. वर्षाचे ३६५ दिवस मी तलावपाळीवर फ़िरायला येते इतकी मोठी झाडं माझ्या नजरेतून कशी सुटली?
घरी येऊन विचारणा केली तर बहीण म्हणाली,"अगं ती पहिल्यापासूनच तिथे होती..तुझ्या कसं नाही लक्षात आलं एवढ्या वर्षात?"
तिच्या चेहरयावर आश्चर्य होते. ती नक्कीच माझी थटटा करत नव्हती.
मला हे गंभीर वाटलं.
मी ’प्रिय’ला फ़ोन करुन हे सांगीतलं तर तो मला म्हणाला "थोडा विचार कर. तुझ्या आजूबाजूला बघ. तुझं तुलाच कळेल."
आणि मी खरंच तसं केलं.
मला दिसला न बघता कोपरयात भिरकावलेल्या ग्रीटींग कार्डसचा गठ्ठा, मोबाईलवर कधीकधी इग्नोर करत असूनही नियमीतपणे येत असलेले कॉल्स, कंटाळा आला म्हणून कट केलेले कॉल्स, आजही न उचललेले चार-पाच मिस्ड कॉल्स.
मेलबॉक्स उघडला तर आतापर्यंत उघडूनही न पाहिलेल्या, उत्तरं न देता तशाच पडलेल्या मेल्स दिसल्या.
सगळी जिव्हाळ्याची माणसं. मी कितीही माज करो माझी नियमीत विचारपूस करतात, काळजी करतात.
And suddenly, it dawned on me.
आणि ही सगळी मंडळी विचारत असल्यासारखी वाटली,
"आम्ही नेहमीच तुझ्यासोबत असतो...होतो, तुझं लक्ष नव्हतं का?"

12 comments:

BinaryBandya™ said...

कधी कधी काही गोष्टी हातातून निसटल्यावरच कळतात ...
छान झालाय लेख

Saru said...

Deja Vu. मलाही अनेकदा असे वाटले आहे. पण अनेकदा वाटले यातच सगळे आले.
Short and sweet उपरती.

Shraddha Bhowad said...

@बी.बी
माझ्याबाबतीत म्हणायचं झालं तर गोष्टी वेळ जाण्याच्या आधी त्या मला कळून चुकतात आणि नंतरचं रामायण टळतं. I am quite lucky for that matter..पण निसटल्या असत्या तर काय ह्याची जाणीव कुठेतरी असतेच हे ही तितकंच खरं. :))

@सरू
असं अनेक वेळ वाटलंय??
आपल्यात बरंच साम्य असावं मग.
:)))

Sandeep said...

cool! Nice post.

Sandeep said...

cool! Nice post.

Rohiii said...

माझंही असच होत ...

Shraddha Bhowad said...

@सॅडी, रोहिणी,
आई शप्पत! सगळ्यांचंच असं होतंय.
You make me feel less weird though.
Thanks.

Salil Chaudhary said...

अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

Saru said...

Congratulations Shraddha! We heard it. :)

Saru said...

Congratulations Shraddha! We heard it. :)

Shraddha Bhowad said...

@सलिल, सरु
धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद!

Suhas Diwakar Zele said...

मस्त झालीय पोस्ट काहीशी सगळ्यांचीच अवस्था अशी होते कधी ना कधी...आणि हो अभिनंदन पण बर का :)
लिहते रहा..शुभेच्छा

 
Designed by Lena