’ऑफ़’!

You have a new message!
राणीने घा‌ईघा‌ईत मेलबॉक्स उघडला आणि तिने आनंदाने जवळवळ उडीच मारली. नीराचं उत्तर.
राणी या जबरदस्त पोरीची फ़ॅन.
ताठ, तत्वनिष्ठ आणि निडर नीरा.
दोनच दिवसापूर्वी अंगातले धाडस एकवटून तिने नीराला मेल लिहीली होती. तिला कसं नीरासारखं निडर व्हावंसं वाटतं, बंधनं झुगारुन द्यावीशी वाटतात, स्वत:करता जगावंसं वाटतं वगैरे. स्वत:कडून तिनं केलेलं एक मुक्त आत्मचिंतन होतं म्हणा ना..
"तुला भीती कशी वाटत नाही एखाद्या गोष्टीची?" तिने नीराला विचारलं होतं.
काय म्हणते यावर नीरा?

"परिणामांची भीती संपली की माणूस निडर होतो. आणि मी तर कायम पर्यायांचंच आयुष्य जगत आले. चोखाळायच्या वाटांची वानवा मलातरी कधीच नव्हती. मला जे करावंसं वाटलं, त्यावेळी योग्य वाटलं-तेच केलं"

मस्त!
पण नीराबा‌ई, तुम्ही किती सहजपणे सांगताय सगळं.
एकदा माझं आयुष्य जगून पहा. दुसरयाला बांधलेलं, दुसरयांभोवतीच फ़िरत असलेलं, कायम पडतं-नमतं घ्यायला लागणारं..
राणीने हे टा‌ईप केलं आणि दिलं पाठवून.
दोनच मिनीटांनी नीराचं उत्तर हजर. वॉव्ह!

"स्वीकाराचंच आयुष्य जगत आली असशील आजवर तर मग आणखी काय होणार? आज आहे हे असं-तसंच असण्याला काही पर्याय होता का-याचा विचार केलास कधी?"

आ‌ई गं! ही अशी कशी आपल्या गाभ्यातलंच बोलतेय?- हिच्याशी बोललंच पाहिजे.
"ऑनला‌ईन आहेस?" Message sent to Neera
दोनच मिनीटांनी-
New message from Neera

"आहे."

"चॅटवर येतेस का?" Message sent to Neera
New message from Neera

"जरुर! दोन मिनीट्स फ़क्त-आलेच"
.
दोन मिनीट्स झाली..
.
.
.
पाच
.
.
.

पंधरा मिनीट्स झाली..
"Messages you send will be delivered when Neera comes online"
.
.
.
अर्धा तास झाला.
नीरा आलीच नाही.
राणी थोडीशी हताश, थोडीशी रडवेली, फ़सवली गेल्यासारखी वाटणारी.
नीराच्या मेल्समुळे अंगात आलेलं थोडंफ़ार बळ सुद्दा राणीला सोडून जा‌ऊ लागलं.
पण राणी काय करु शकणार होती?
.
.
.
.
.
.
.
.
.
.

तिला मुळात हे माहीत नव्हतं की तिचं जी-मेल चं ’मल्टीपल सा‌ईन-इन’...
’ऑफ़’ होतं.


9 comments:

केसु said...

class.... asha theme kahi movies pan aalya aahet na? nakki aathvat nahiye konti te..

Shraddha Bhowad said...

केदार,
तुला ’कार्तिक कॉलिंग कार्तिक’ची आठवण झाली असेल.
का.कॉ.का एम.पी.डी (Multiple Personality Disorder) वर आहे. एम.पी.डी वर बरीच पुस्तकं पण आलियेत की. शेल्डनचं ’टेल मी युअर ड्रीम्स’ वानगीदाखल.

Eat & Burpp said...

zakkas zalay...ekdum anapekshit asa!! pan suchla kasa achnak? kahi vishesh ghadamod? ki asach baslya baslya??

Ketaki Abhyankar said...

बऱ्याच दिवसांनी तुझी पोस्ट पाहून छान वाटलं. मस्त झालीय खूप. मलाही कार्तिक कॉलिंग कार्तिक ची आठवण झाली. कालच केबल वर पाहत होते तो आणि आज आल्या आल्या ही पोस्ट वाचल्यावर पहिला MPD चाच विचार आला डोक्यात. . :)

"टेल मी युअर ड्रीम्स" वाचलंय मी, अफाट पुस्तक आहे, पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवूच नये वाटतं.

Shraddha Bhowad said...

गीता,
:)
माझ्याबाजूने ’अशा’ विशेष घडामोडी नाहीत, घाबरु नकोस. (तसंच वाटलं असेल तर). सहज सुचलं-लिहीलं.

केतकी,
थॅंक्स!
सगळ्यांनाच का.कॉ.का ची आठवण येतेय.
आणि ’टेल मी’ बद्दल सहमत. माझ्या इंग्लिश-कादंबरी वाचनाची सुरुवात मी या पुस्तकाने केली होती.

Rahul-brain with beauty said...

short one but solid one .

Rahul Deshmukh said...

सही.

राणी आणि निरा. हे पटकन झेपलंच नव्हतं. :-)

Nil Arte said...

विक्केड !!!
माझी पण एक तळहाता एवढी गोष्ट
http://nilesharte.blogspot.com/2011/10/blog-post_15.html
कशी वाटते सांग

Nil Arte said...

आज सगळ्या तळ-हाता एवढ्या गोष्टी वाचून काढल्या ...तू खूप छान लिहितेस आणि म्हणूनच मला तुझा अतिशय राग येतो ... जीव तोडून डान्स शिकणार्याला ह्रितिकचा यावा तसा ....किंवा आपल्याला जीवापाड आवडणारी पोरगी "जॉन अब्राहम" च्या नावानी उसासे सोडते तेव्हा "जॉन" चा येतो तसा...
श्रद्धा, ह्रितिक किंवा जॉन ची यात काहीच चूक नसते..पण राग आपला येतोच :D

एनीवेज मी तुझ्या "ऑफ" गोष्टीबद्दल धनंजय मासिकाचे प्रकाशक राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी सहज बोललो आणि त्यांना ती खूप आवडली...जमल्यास त्यांना फोन कर : 9833222107

 
Designed by Lena