कोणे एके काळी
स्पर्शांना अर्थ होता.
आपल्याला स्पर्श कळतोय तर स्पर्शांनाही आपण कळायला हवं असा विचार होता.
स्पर्शाने जे जाणवतंय तेव्हढंच असणारेय असं व्हायचं नाही..
स्पर्शामध्ये जे आहे तेव्हढंच जाणवायला हवं असंही असायचं नाही.
स्पर्शांना काहीही प्रश्न विचारता यायचे..
स्पर्शांनीच उत्तरंही मिळायची.
पुष्कळ दिल्या-घेतल्याचं वाटत राह्यचं सतत..
स्पर्श अनेक होते-
गृहित धरलेले..
सवयीने फ़िरणारे..
अहोरात्र टिकटिकत राहणारे..
शरीराच्या आतातात अभंग राहणारे..
फ़ुलपाखरासारखे भिरभिरणारे..
काही बिलोरी काचेच्या हलत्या झुंबरासारखे..शरीरभर झालेले..
नुकत्याच बनवलेल्या कवळ्या कवळ्या आरशासारखे..
बोटांतून खोलवर रुतणारे..
समजण्याइतपत गूढ असणारे..
अबोल हुकूमत गाजवणारे..
डोळ्यांमधले लाल जळजळीत,
खोल चिरत हाडापर्यंत पोचणारे..
कुठलेतरी एक-दोन सापाच्या गिळगिळीत, जाड वेटोळ्यासारखे..
किंवा मग कडकडीत वाळलेल्या चामड्याच्या वादीसारखे..
आठवणीतल्या काळोख्या ड्रॉवरमध्ये लपवून ठेवलेले.
तर एखादा स्पर्श अधलामधलाच, जसा की-
तरूण मुलीच्या शरीरापासून दूरदूर करणारया बापाचा- बिचकलेला..
कधी इवलासा, ठसठसणारा- वेदनेचा..सुईच्या अग्रावर मावेल इतकासा..
आणि
नुसतेच उमटलेले हजार..
रंगांच्या छटा-फ़टकारयांतल्या फ़रकांचे..
.
.
.
मग कधीतरी स्पर्शांवर हेत्वारोप होतात.
स्पर्श दुखरे दुखरे होऊन जातात.
मग स्पर्श भांबावतात..
आकसतात..
त्यांची मिती बदलते..
ते पाणी सांडलेल्या चित्रासारखे धुरकट, धूसर होत जातात.
काही केल्या सलगपणे येत नाहीत आपल्यापर्यंत.
"आधी स्पर्श मग अर्थ की
आधी अर्थ मग स्पर्श" ह्या झगडयात
अर्थ, हेतू गाळत-गाळत केव्हातरी येऊन पोहोचतात तेव्हा
ती एक शारिरीक क्रिया उरलेली असते.
याउपर त्यातून काही दिलं-घेतलं असण्याचे संभव उरत नाहीत मग.
असं होत राहतं,
माहित नाही किती वेळा, कितव्यांदा..
आणि मग एके दिवशी
स्पर्श कळायचेच थांबतात
--
जाणारे जाताना काय घेऊन जातील याचा नेम नाही.
नको असताना काय देऊन जातील याचाही..
मग आपण ते देणं चुकवत राह्यचं.
कितीतरी दिवस, महिने, वर्षं...झालंच तर
आयुष्यभर!
स्पर्शांना अर्थ होता.
आपल्याला स्पर्श कळतोय तर स्पर्शांनाही आपण कळायला हवं असा विचार होता.
स्पर्शाने जे जाणवतंय तेव्हढंच असणारेय असं व्हायचं नाही..
स्पर्शामध्ये जे आहे तेव्हढंच जाणवायला हवं असंही असायचं नाही.
स्पर्शांना काहीही प्रश्न विचारता यायचे..
स्पर्शांनीच उत्तरंही मिळायची.
पुष्कळ दिल्या-घेतल्याचं वाटत राह्यचं सतत..
स्पर्श अनेक होते-
गृहित धरलेले..
सवयीने फ़िरणारे..
अहोरात्र टिकटिकत राहणारे..
शरीराच्या आतातात अभंग राहणारे..
फ़ुलपाखरासारखे भिरभिरणारे..
काही बिलोरी काचेच्या हलत्या झुंबरासारखे..शरीरभर झालेले..
नुकत्याच बनवलेल्या कवळ्या कवळ्या आरशासारखे..
बोटांतून खोलवर रुतणारे..
समजण्याइतपत गूढ असणारे..
अबोल हुकूमत गाजवणारे..
डोळ्यांमधले लाल जळजळीत,
खोल चिरत हाडापर्यंत पोचणारे..
कुठलेतरी एक-दोन सापाच्या गिळगिळीत, जाड वेटोळ्यासारखे..
किंवा मग कडकडीत वाळलेल्या चामड्याच्या वादीसारखे..
आठवणीतल्या काळोख्या ड्रॉवरमध्ये लपवून ठेवलेले.
तर एखादा स्पर्श अधलामधलाच, जसा की-
तरूण मुलीच्या शरीरापासून दूरदूर करणारया बापाचा- बिचकलेला..
कधी इवलासा, ठसठसणारा- वेदनेचा..सुईच्या अग्रावर मावेल इतकासा..
आणि
नुसतेच उमटलेले हजार..
रंगांच्या छटा-फ़टकारयांतल्या फ़रकांचे..
.
.
.
मग कधीतरी स्पर्शांवर हेत्वारोप होतात.
स्पर्श दुखरे दुखरे होऊन जातात.
मग स्पर्श भांबावतात..
आकसतात..
त्यांची मिती बदलते..
ते पाणी सांडलेल्या चित्रासारखे धुरकट, धूसर होत जातात.
काही केल्या सलगपणे येत नाहीत आपल्यापर्यंत.
"आधी स्पर्श मग अर्थ की
आधी अर्थ मग स्पर्श" ह्या झगडयात
अर्थ, हेतू गाळत-गाळत केव्हातरी येऊन पोहोचतात तेव्हा
ती एक शारिरीक क्रिया उरलेली असते.
याउपर त्यातून काही दिलं-घेतलं असण्याचे संभव उरत नाहीत मग.
असं होत राहतं,
माहित नाही किती वेळा, कितव्यांदा..
आणि मग एके दिवशी
स्पर्श कळायचेच थांबतात
--
जाणारे जाताना काय घेऊन जातील याचा नेम नाही.
नको असताना काय देऊन जातील याचाही..
मग आपण ते देणं चुकवत राह्यचं.
कितीतरी दिवस, महिने, वर्षं...झालंच तर
आयुष्यभर!


तरल, सुंदर, लोभस इत्यादी. पण मुळात स्पर्शापलिकडले अस्पृश्य.
@a Sane man,
थॅंक्स. हे तरल, सुंदर, लोभस वगैरे घाऊक मिळतं हल्ली त्यामुळे त्याचं एव्हढं नाइ काही. पण ते स्पर्शापलीकडचं अस्पृश्य (तुला अस्पर्श म्हणायचे होते का?) म्हणालास नं, ते महत्वाचं- माझ्यासाठी.
मला अस्पृश्य म्हणायचंय की अस्पर्श याचा मी लिहिताना थांबून विचार केला होता. तेव्हा मला कळलं की त्यांच्या अर्थांत काहीच फरक नाही. अस्पृश्य समाजबदनाम नि अस्पर्श कविताबदनाम एवढाच काय तो फरक असावा. पण मला अस्पृश्यच म्हणायचं होतं - स्पर्शता येत नाही, स्पर्शवत नाही आणि स्पर्शू नये (कोणत्याही विषमवृत्तीने नव्हे, सकारात्मक अर्थछटेने) असेही काही.
खूप छान ..ही कविता हंस किंवा मौजला पाठव , १०० टक्के छापतील ते !
निलेश,
तू कविता म्हटल्यानंतर पहिल्यांदा चमकून पुन्हा एकदा वाचून काढलं लिहीलेलं. नाही रे! पद्य प्रकार नाहीये तो फ़ारफ़ारतर ’गपद्य’ होऊ शकेल. गद्य आणि पद्य मधलं क्रॉस-हायब्रिड. कुडण्ट हेल्प इट. असंच स्निपेट्स मध्ये आलं डोक्यात. थोडंसं तुटक तुटक आहे खरं पण म्हणून तिच्यावर कवितेचा आरोप नाही करु शकत मी. :)
आणि मौजेचं आणि हंसचं म्हणशील तर तो प्रकार मी अजून ट्राय नाही केला. करु तेव्हा बघूयात.
आवडले नाही.
पहिल्यांदा अर्थपूर्ण असणारे स्पर्श नंतर गूढ बनत हाड-बीड चिरत जाणारेत हे पहिल्याच वाक्यात ताडता येते. (पुढे bone marrow पर्यंत जात नाहीत काय, तिथेही चेता-पेशी असाव्यात:-)) तिथलं लिमिट संपले कि ते गिळ-गिळीत होत सापाच्या वेटोळ्या सारखे होणे अपरिहार्य होते. वासनेच्या स्पर्शांना दुसरं रूपक मराठीत नाही का? पुन्हा त्यांच्यातला अर्था-अनर्थाचा शोध निरर्थक आहे ह्या ठाशीव निष्कर्षापर्यंत येत मृत्यू पर्यंत स्पर्शाचा प्रवास होतो.अस्पर्षाचा प्रवास या लिमिटच्या ही पुढे जायला काय हरकत आहे? किंवा ह्या प्रवासाच्या सुरवातीचे स्पर्श-बिंदू कुठे आहेत?
सचिन,.. :)
आवडलं नाही...मान्य.
माझ्या स्पर्शांचा अनुभव सर्वसमावेशक आहे असा माझा अजिबात दावा नाही त्यामुळे तो दुसरया कोणासारखा असायला हवा असा माझा हट्टही नाही.
स्पर्शाच्या तुझ्या व्याख्या, तुझे अनुभव तू माझ्या अनुभवांशी टॅली करायला गेलास तर याहून वेगळे काही होऊ शकणार नाही असं मला वाटतं. (असं केलं असतंस तरी माझी पोस्ट तुला आवडली असती असंही माझं म्हणणं नाही)
<<अस्पर्षाचा प्रवास या लिमिटच्या ही पुढे जायला काय हरकत आहे?
हे तुला असावंसं वाटतं, मला वाटलं नाही
किंवा
<<ह्या प्रवासाच्या सुरवातीचे स्पर्श-बिंदू कुठे आहेत?
अमुक ठमुक बिंदूपाशी सुरुवात, ठमुक पाशी शेवट असा फ़ॉर्म मध्ये मुळातच लिहीलेले नाहीये. हे स्निपेट्स मधले लिखाण आहे. त्यामुळे तू लिखाणातले कुठले नॉर्मस शी पडताळून बघत असशील तर बघ बुवा.
वैयक्तिक अनुभव असे तसेच असावेत किंवा असले पाहिजेत, मग तो अनुभव तुला असाच का नाही आला किंवा तू तो अशातशाच शब्दात का मांडला नाहीस? हे दुसरयाचे प्रश्न माझ्या वैयक्तिक अनुभवांच्या नॅरेशनला लागू होत नाही.
आवडलं नाही हे तुझं वैयक्तिक मत कळलं आणि ते मला मान्य आहे. अगदी. :)
Yo do check my new blog if u cn n send some feedback...
http://nilesharte.blogspot.com/2011/11/blog-post_24.html
been a while since u wrote something ..us waiting
-Nil