वेदनेचा वाटसरु.

मेघना, पाठचा खो दिल्याला फ़ारसा वेळ नाही लोटला पण खो घेऊन बघता बघता वर्षं लोटली की! 

--

तर फ़ैज.

फ़ैजच्या कविता कशा आहेत हे सांगायला मला बरयाच प्रतिमांचा आधार घ्यायला लागणार आहे कारण त्याला, फ़ॉर दॅट मॅटर कुठल्याही ’चांगल्या’ कवीला सरळसोट शब्दांत मांडणं १ अधिक १  चं २ इतकं साधं नाहीये." कविता कशी वाटली?" या प्रश्नाला ’नाईस’ किंवा ’छान आहे’ इतकंच उत्तर देणं यांत डिप्लोमसीचा भाग खूप असतो. एकतर ज्याने आपल्याला ती वाचायला दिली त्याचं मन मोडायचं नसतं किंवा आपल्याला ती अजिबात सुधरलेली नाहीये हे दुसरयापासून लपवायचं असतं आणि समोरच्याला ती कळलेली असली तर त्याला कळते पण आपल्याला कळूच कशी शकत नाही हा सूक्ष्म गंड आणि त्याला दडपण्याकरता "व्हॉव्व्व्ह !" करत आलेला अहंकार खूप असतो.

कविता भिडली, आपण ती भोगू शकलो तरच ती आवडू शकते असं मला वाटतं. आपल्याला आवडलेली कविता आपल्यावरच लिहीली गेलिये इतपत ती आपली वाटते.  कवितेमुळे आपण असे समूळ हलतो की "हल्ल! आपल्यात नाहीच काही हललं" असं स्वत:ला निक्षून सांगत, पुन्हा पुन्हा बजावत आपण तिच्यापासून लपायला पाहतो. पण तरीही त्या जळ्ळ्या मेल्या कवितेने इतकी ओढ लावलेली असते  न राहवून, पुन्हा पुन्हा वाचत आपण तिला आयुष्यभराकरता पदरात पाडून घेतो. पुढे कधीतरी आपल्याला ती खिंडीत पकडते वगैरे आणि आपण सर्व बहाणे विसरुन  तिला शरण जातो. किंवा आपल्याला ती इतकी भुरळ घालते की ती पूर्ण दिवस, महिनोंमहिने झालंच तर वर्षोनवर्षे ती आपल्या डोक्यात छुमछुमत राह्ते. माझ्या डोक्यात कविता वाजते ती अशी वाजते.   मला समीक्षकांचं माहित नाही ऍंन्ड आय डोण्ट गिव्ह अ डॅम्न! याची नोंद घ्यावी. 

फ़ैजच्या कविता मोझेक टाईल्स सारख्या आहेत. बघायला गेलं तर शेकडो असमान रंगाचे, चित्रे असलेले, चित्रविचित्र आकारातले तुकडे मन मानेल तसे लावलेत असं वाटतं. बघायला गेलं तर ते फ़क्त वेगवेगळे पॅटर्न्स आहेत नाहीतर कोणाकोणाला त्यातून चेहरा दिसतो किंवा अख्खीच्या अख्खी कथा उलगडत गेल्यासारखी वाटते. एक दोर हातात घेउन रीळ सोडून द्यावं आणि ते बेटं लांबच्या लांब पसरत जावं अशा फ़ैजच्या कविता नाही. फ़ैजच्या कवितेत ज्याला रुढार्थाने ’सलगपणा’ म्हणतात तो नाही. फ़ैज पत्ते फ़ेकतो आणि म्हणतो की "घ्या! लागला सिक्वेन्स तर पाहा! "

कविता वाचल्या की माझ्या डोक्यात तरी त्या गद्य फॉरमॅटमध्येच इंटरप्रीट होतात. मग अनुवाद/रुपांतरावर आपण जे काही पद्य संस्करण करायचं ते करतो. कारण माझी व्यक्त होण्याची,  समजूत  पटण्याची पद्धत गद्य आहे. आणि फ़ैजने कविताच का लिहील्या असाव्यात? या मनात उठलेल्या प्रश्नावर ती त्याची व्यक्त होण्याची पद्धत असावी आणि मुख्य म्हणजे त्याचा ’कम्फ़र्ट झोन’ इतकं शहाणं-समजूतदार उत्तर मिळतं.

फ़ैजची ओळख ’आंधळ्याच्या गायी’तून झालेली, त्यामुळे त्या कवितेशिवाय माझ्या मनातला फ़ैज पूर्ण होणे नाही. आणि फ़ैज वेदनेवर हळुवार फ़ुंकर घालत, तिला जपत जपत-तिला धक्का लागणार नाही याची काळजी घेत लिहीतो त्याचं मला खूप अप्रूप आहे. त्याच्या कवितेत ’हार्श’, कठोर गोष्टी फ़ार कमी आहेत. त्याच्या कवितांमध्ये आहे हे सर्व असं आहे आणि तो आपलाच चॉईस आहे हा स्वीकार आणि समजूत आहे, तरीही त्या वाटेवर हार न मानता अखंड चालणं आहे, कुठलाही त्रागा नाही, वसवस नाही- या गोष्टी मला खूप भावल्या. कारण खूप ऑब्व्हियस आहे-त्याच्या वेदनांचा प्रवास हा माझा प्रवास आहे, कदाचित खूप जास्त इन्टेन्स!

मला जितका गुलझार आवडतो तितका फ़ैज आवडत नाही. पण फ़ैज कधीकधी सरसरुन भिडतो, त्यामुळे त्याचं देणं अमान्य नाहीच.

त्यामुळे सादर आहे-फ़ैज अहमद फ़ैज.

--

आए कुछ अब्र

आ‌ए कुछ अब्र कुछ शराब आ‌ए
उस के बाद आ‌ए जो अज़ाब आ‌ए

बाम-ए-मीना से माहताब उतरे
दस्त-ए-साक़ी में आफ़ताब आ‌ए

हर रग-ए-ख़ूँ में फिर चराग़ाँ हो
सामने फिर वो बेनक़ाब आ‌ए

उम्र के हर वरक़ पे दिल को नज़र
तेरी मेहेर-ओ-वफ़ा के बाब आ‌ए

कर रहा था ग़म-ए-जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आ‌ए

न ग‌ई तेरे ग़म की सरदारी
दिल में यूँ रोज़ इन्क़लाब आ‌ए

जल उठे बज़्म-ए-ग़ैर के दर-ओ-बाम
जब भी हम ख़ानाख़राब आ‌ए

इस तरह अपनी ख़ामोशी गूँजी
गोया हर सिम्त से जवाब आ‌ए

’फ़ैज़’ थी राह सर बसर मंज़िल
हम जहाँ पहुँचे कामयाब आ‌ए

मळभ येता..

वर मळभलेलं आकाश, हाती वारुणी -हे म्हणजे
वेदनांच्या आग्यामोहोळाला आयतंच आमंत्रण

आकाशाच्या सज्ज्यातून चंद्र तर दिसायला लागलाय एव्हाना
वारुणीतला सूर्य मात्र अजून चढायचा आहे

(मग)
रक्ताचा कण-न-कण असा काही धडधडून पेटतो
की त्या(वेदना) अशा चरचरीत नागड्या होऊन समोर ठाकतात

मग मी माझ्याच गतायुष्यात एक फ़ेरी मारुन येतो
तुझ्या प्रेमाचे आणि निष्ठेचे कितीतरी थांबे लागतात तिथे

मी असा माझ्या पोतंभर दु:खाचा हिशोब करत बसलेलो
की तुझी पिळवटून आठवण येणं किती अपरिहार्य

मी मनातल्या मनात कितीही बंड केलं तरी
(सत्य हेच आहे)
तुझ्या नावे डागलेल्या दु :खाचा आकांत कधी संपलाच नाही खरंतर

मी असा ध्वस्त, भणंग भटकतोय तेव्हा
दुसरयांच्या घरातल्या लखलखणारया मैफिली पाह्तो
(पण ठिक आहे मी म्हणतो)

(पण कधी तरी न राहवून)
माझं मौन दशदिशांनी किंचाळून उठतं
जणू काही कुठून तरी उत्तर मिळणारच आहे
(पण तसं कधी होत नाही)

(पण असंय की)
हा पूर्ण प्रवास फ़ैजची निवड होती
त्यामुळे जे चाललंय ते ठिकच म्हणायचं

---

मेरे दर्द को जो जबॉं मिले

मेरा दर्द नग़मा-ए-बे-सदा
मेरी ज़ात ज़र्रा-ए-बे-निशाँ
मेरे दर्द को जो ज़बाँ मिले
मुझे अपना नामो-निशाँ मिले

मेरी ज़ात को जो निशाँ मिले
मुझे राज़े-नज़्मे-जहाँ मिले
जो मुझे ये राज़े-निहाँ मिले
मेरी ख़ामशी को बयाँ मिले
मुझे क़ायनात की सरवरी
मुझे दौलते-दो-जहाँ मिले

शब्दांची वळचण

माझ्या वेदनेचे ध्वनी
माझ्या अस्तित्वाची ग्वाही आहेत
जरा शब्दांची वळचण मिळाली त्यांना
तर मला माझीच ओळख पटेल

माझी अस्तित्वाची खूण पटली
तर मला विश्वाचं रहस्य कळल्याचा आनंद होईल
मला माझ्या सर्व गीतांच्या जन्माचे रहस्य कळेल
माझ्या मौनाला वाचा फ़ुटलीच कधी तर
तर अवघे जग माझ्या पायापाशी गोळा झाल्याचे वाटेल
दोन जगतातील दौलत म्हणतात-ती आणखी काय असते?

--

माझा खो राहुल आणि निखिलला, आणि संवेद , तू घेतलास तर!

11 comments:

Meghana Bhuskute said...

Thanks. toortas itakach. sawkashine parat yete.

Unknown said...

फैजच्या दोन्ही कवितांचे अनुवाद आवडले.
मीही माझ्या ब्लॉग वर रोमानियन कवितांचा अनुवाद लिहिते आहे. जरूर वाच. तुझा प्रतिसाद वाचायला आवडेल.

Meghana Bhuskute said...

आधी तत्परतेनं खो घेतल्याबद्दल आभार.
मी थोडी चिकित्सक भूमिका घेणार आहे (नि त्याबद्दल ’ही कोण चिकित्साखोर मास्तरीण लागून गेलीय ठाऊकाय’ अशा शिव्याही खाणार आहे!), त्याबद्दल आधीच माफीबिफी मागून ठेवते. पण असल्या चिकित्सांबद्दल रागाला येण्याइतके काही आपण लेचेपेचे नाही, अशी आशाही आहे. असो.
कवितेचं भाषांतर मला कैच्या कै सोप्पं वाटत असे. पण फैजच्या एका कवितेनंच माझी पार विकेट घेतली. शब्दांचा नाद, त्यातली लय, एकेकट्या शब्दातलं, शब्दसमुच्चयातलं, नि मधल्या रिकाम्या जागांमधलं अर्थांचं मोहोळ... हे सगळंच्या सगळं एका भाषेतून दुसर्‍या भाषेत उचलून नेणं अशक्य आहे, हे मी मान्य केलं. पण मूळ कवितेच्या अर्थाच्या, लयीच्या आणि नादाच्या शक्य तितक्या जवळ जाण्याची, तितक्याच डौलदारपणे जाण्याची किती मोठी जबाबदारी भाषांतरकारावर असते, नि तरीही ’मूळ कवितेची सर नाही’ हे कायमचं अपयश त्याच्या भाळी कसं लिहिलेलं असतं, तेही कळत गेलं. ते आव्हान आपण कसे पेलतो ते पाहायची उत्सुकता होती, म्हणून हा खो. (म्हणून एकाच कवितेचं भाषांतर करावं अशी अपेक्षा. पण पहिल्याच खोमधे ते बारगळलं. :( असो.) माझ्या भाषांतरावरही असले आक्षेप नोंदवले जावेत, अशी अपेक्षा आहे. ’वा, वा, सुंदर, अप्रतिम’ हे नेहमीचे कलाकार नाही भेटले तरी हरकत नाही.
तर -
मला ’आए कुछ अब्र’चं हे भाषांतर नाही आवडलं. कंस वापरणं हा भाषांतरकाराचा पराभव वाटला. नि मुख्य म्हणजे ’चाललंय ते ठीकच म्हणायचं’ हे फैजच्या मूळ ओळींच्या कृतार्थ आनंदाशी अगदी विसंगत, ’चालसे’ वाटलं.
पण दु:खाचा ’आकांत’, ’धडधडून पेटलेला रक्ताचा कण न्‌ कण’ हे मात्र जमून गेलेलं.
दुसरी कविता माझ्या ओळखीची नव्हे. (आता मिळवून आपलीशी करण्यात यील. आभार!)
’वळचण’ का बरं वापरावासा वाटलाय तुला? वळचणीला काहीसे निरुपयोगी गोष्टींचे लागेबांधे नाहीत? की मलाच तसं वाटतंय?
(कलोअ. पण रागेजून घातल्यासच चार शिव्या तरी आपली काही हरकत नाही. दोन द्यायची - घ्यायची तयारी आहे. ;-))

Unknown said...

माझा ब्लॉग
Shabdaatunkeval.blogspot.com

Shraddha Bhowad said...

उज्ज्वला,
नक्की वाचते सवडीने.
पण भाषांतराचा नुसता यत्नही स्तुत्यच त्यामुळे त्या सु़दर असणारच यात वाद नाही.

Shraddha Bhowad said...

मेघना,
रागेजणं वगैरे सोडूनच बोललीस यापुढे तरी हरकत नाही. माझी तेव्हढीच एक-दोन वाक्यं वाचतील.
आपण भेटल्यावर यावर सविस्तर बोलूयात.

Anonymous said...

अर्थात नेहमीचे लिहिणे, सुरुवात सॉल्लीड.
फ़ैज केवळ कविता करतो, गज़ल रचतो. गज़ल आधी मग कविता भाषांतर केल्यात तू.
लिहिण्यात इतकं खोलातून कसं झिरपतं? सर्वसमावेशक प्रश्न.
प्रतिमा वापरल्यात, जवळच्या होत्या म्हणून मी धडधडत राहिलो. तू मात्र गद्य लिहलंस, पद्यांना. काय लिहू तुझ्या प्रतिमांमुळे मी थक्क होतो नेहमी.

Shraddha Bhowad said...

दुरित,

<<लिहिण्यात इतकं खोलातून कसं झिरपतं?
मला माहित नाही. मी कदाचित तेव्ह्ढं उकरुन उकरुन काढत असेन. आणि असंय की मी कितीही उकरलं तरी मला ते जितकं खोल वाटतं तितकं समोरच्याला वाटेल असंही नसतं. त्यामुळे त्या ’खोलीचा’ आपल्यापुरता अंदाज लावावा लागतो. ते शि़चं जमत नाही. त्यामुळे नुस्तं लिहायचं झालं. दुसयाला ते खोल वाटतं की उथळ हे तसंही माझ्या हातात नसतं.
त्यामुळे तुझ्या प्रश्नाला माझा प्रतिप्रश्न असा आहे- तुला काय वाटतं-लिहिण्यात इतकं खोलातून कसं झिरपत असेल?
तळटिप: मला एहिमायेवर तुझी कमेंट अपेक्षित होती.

Vikram Virkar said...

Nice!!/ Chaan ahe :-) ;-)

Shraddha Bhowad said...

बरं विक्रम. :)
तू ’शौर्य’ पाहिला आहेस का? केके मेननने ’नाईस’चं केलेलं निरुपण जरुर ऐक जमल्यास.

Vikram Virkar said...

:-( Nahi athvat.. Pan, "Dushman sirf border ke uss paar nahin hota ... ghar ke andhar bhi hota hai", "Jab zindagi credit pe chal rahi ho na ... toh vastavikta thodi si dhundli ho jaati hai" aani "Main hamesha ek second aage rehta hoon" he athvle.. Pan punha ekda Nakki baghen.. :-)

 
Designed by Lena